Sunday, September 26, 2010

पुनर्विकसन इमारतींचे मुल्यांकन:

जुन्या इमारती पाडुन नविन इमारती बांधण्याचं सध्या फॅड आलय. पुण्या मुंबईत तर बिल्डराना सर्रास जुन्या इमारती दिल्या जात आहेत. जुन्या पाडल्याअ जाणा-या इमारतीचे विकसन मुल्यांकन पकडले जात होते. मात्र नवीन आदेशानुसार क. ३१ खाली अभिनिर्णय करुन घेतल्यास असे मुद्रांक आता भरण्याची गरज नाही. पुढील वर्षी मात्र हि तरतुद रेडी रेकनरमधे येणार आहे.
नोंदणी: नोंदणीसाठी पुर्वमुद्रांकित केलेला व सह्या झालेला दस्त (दोन साक्षीदारांचे) सह्यांसहित निष्पादित केलेला मुळ दस्त सदर दस्ताच्या तारखेपासुन चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी हजर करावा लागतो. पुणे शहरात एकुण २० नोंदणीची कार्यालये असुन, कोणत्याही कार्यालयातुन दस्त नोंदविता येतो. मात्र इतर क्षेत्रांत त्याच कार्यक्षेत्रातील नोंदणी कार्यालयात दस्त नोंदवावा लागतो. चार महिन्यांत दस्त न नोम्दविल्यास पुढील चार महिन्यात दंड भरुन दस्त नोंदविता येतो. दस्त निबंधकांना समजेल अशा कोणत्याअही भाषेत असु शकतो. दस्ताची नोंदणी करण्यापुर्वी संपुर्ण दस्तांची सर्व जोडलेल्या कागदपत्रांसहित ९० जीएसएम कागदावर बटरपेपर सहित फोटोप्रत काढणे आवश्यक असते. याशिवाय सर्व वर्णनाचा एक इनपुट फॉर्म लिहून देणार/घेणार यांची सही असलेला सादर करावा लागतो. पुण्यासारख्या शहरात दस्त नोंदणीसाठी खुपच गर्दी असल्याने आदल्या दिवशी सकाळी जाऊन दुस-या दिवसाचे नंबरचे टोकन घ्यावे लागते. त्यामुळे ९० जीएसएम फोटोप्रत व इनपुट फॉर्म अगोदर जमा करावा लागतो.
मात्र नुकत्याचे झालेल्या सुधारणांनुसार igr.maharashtra.gov.in या संकेत स्थलावर जाऊन सकाळी १० ते १ च्या दरम्यानच्या पहिल्या २० दस्तांसाठी योग्य त्या नोंदणी कार्यालयात ३० दिवस अगोदरपर्य्त नोंदणीसाठी आरक्षण करण्याची सोय आहे. ठरलेल्या वेळेच्या १० मिनिटे अगोदर नोंदणीसाठी सर्व पक्षकारांनी त्यांच्या वकिलासह हजर राहणे आवश्यक ठरते. वकिलाए बार कौन्सिल ओळखपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. सर्व पक्षकार ह्जर नसल्यास उपस्थीत पक्षकारांकडुन दस्ताची ADM प्रलंबित नोंदनी होऊ शकते. उरलेल्या पक्षकारांनी नोंदणीच्या दोन महिन्यांच्या आत सदर कार्यालयात जाऊन नोंदणी करावी लागते. नोंदणीसाठी दस्तातील आवश्यक सर्व तपशिलाचे Computer Feeding झाल्यानंतर नोंदणीपुर्व दस्त गोषवारा प्रिंट अपलब्ध होते. ती अतिशय काळजीपुर्वक वाचावी व दस्ताशी मिळवुन पहावी. दस्त सादर करणा-याची सही झाल्यानंतर सर्व पक्षकाराचे संगणकावर फोटो काढले जातात व सदर प्रतीवर पक्षकारांच्या दोन प्रतींत सह्या घेतल्या जातात. याशिवाय वकिलांची ओळख म्हणुन सही घेतली जाते. दस्त साक्षिदारास नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज नसते. सर्व सह्या झालेला दस्त गोषवारा भाग-१ व भाग-२ हे मुळ दस्त सादर करणा-यांची मुळ रजिस्टरवर सही झाल्यानंतर लगेचच परत मिळतो. त्यापुर्वी मुळ सदर दस्तांचे प्रत्येक पानावर निबंधकाचा शिक्का पेज नंबर येथे आवश्यक असते ते त्याच वेळी तपासावे. याशिवाय मुळ नोंदणीची पावती व सुची क्र. २ ची मुळ प्रत निबंधकाच्या सही शिक्क्यंसहित लगेच ताब्यात मिळते. सुची क्रं. २ साठी रु. २०/- चे कोर्ट स्टॅम्प तिकीट चिटकवावे लागते. तेही तयार ठेवावे.

Saturday, September 18, 2010

मुल्यांकन

नोंदणी व मुद्रांक विभाग दर वर्षी जानेवारिपासुन नविन मुल्यांकन रेडी रेकनर उपलब्ध करुन देतात. त्या प्रमाणेच मुद्रांक शुल्क खरेदी करणे आवश्यक असते. या मुल्यांकनापेक्षा मोबदला रक्क्म जास्त असल्यास त्यावर मुद्रांक शुल्क आकारले जाते. मात्र कमी असल्यास रेडि रेकनरप्रामाणे आकारले जाते. मात्र मोबदल कमी असल्यास नवीन प्राप्तीकर कायदयातील बदलानुसार या फरकावरील रकमेवरसुद्धा प्राप्तिकर देय आहे. त्यामुळे मोबदला कमी दाखविण्यात यापुढे अर्थ नाही.
घसारा: (Depreciation)
जुन्या गाळ्यावर जर दोन वर्षापुर्विचे महापालिका भोगवटा प्रमाणपत्र कर दाखला किंवा लॅंडलाइन दुरध्वनी/विद्युत विलांवरुनही घसारा रक्कम ५% किंवा पुर्वायुष्यावर ७०% पर्यंत मुल्यांकनावर घसारा मिळतो.
दुकान गाळ्यांचे मुल्यांकन
अ) रस्ता सन्मुख नसलेल्या दुकानांचे मुल्यांकन दराचे ८०% पकडले जाते.
आ) खालील तळमजल्यावरील दुकानांचे मुल्यांकन दराचे ८०% पकडले जाते.
गाळ्याच्या भोवतीची मोकळी जागा :
गाळ्याबरोबर भोवतीची मोकळि जागा विकली असल्यास जमीनदराच्या ४०% पकडले मुल्यांकन जाते.
गच्ची टेरेस:गाळ्याच्या लगतचे टेरेसचे मुल्यांकन दराच्या ४०% पकडले जाते. वरिल मजल्यावरील टेरेसचे मुल्यांकन दराचे २५% पकडले जाते.
पार्किंग:बांधीव छताच्या पार्किंगसाठी महापालिका क्षेत्रात दराच्या २५% मुल्यांकन होते. खुले पार्किंग सदर जमिनीच्या दराच्या २५% मुल्यांकनाने होते.
लिफ्ट: लिफ्ट नसल्यास तिस-या मजल्यासाठी दराच्य ९०% मुल्यांकन होते आणि चौथ्या मजल्यासाठी दराच्य ८०% मुल्यांकन होते. लिफ्ट असल्यास ५ ते १० व्या मजल्यासाठी दराच्य १०५% मुल्यांकन होते. ११ ते २० वा मजल्यासाठी दराच्या ११०% मुल्यांकन होते. २१ मजल्याच्या पुढे दराच्या ११५% मुल्यांकन होते.

मुद्रांक शुल्क

मुद्रांक शुल्क
मुंबई मुद्रांक कायदा १९५८ परिशिष्ट २५ प्रमाणे मिळकतीच्या हस्तांतरावर मुद्रांक आकारले जाते. यात साधारणपणे शहरी व ग्रामीण मिळकती आणी रहवासी व बिगर रहवासी असे वर्गीकरण करुन त्याप्रमाणे मुद्रांक आकारले जाते.
ग्रामीण:
साधरणपणे ग्रामीण मिळकतींच्या हस्तांतरासाठी सरकारी मुल्यांकनाच्या ३% + जिल्हा परिषद सेस १% असे एकुण ४% मुद्रांकशुल्क आकारले जाते.
शहरी:
शहरी मालमत्तेच्या हस्तांतरासाठी मिळकतीचे मुल्यांकन रुपये ५,००,०००/- पेक्षा जास्त असल्यास मुद्रांक शुल्क आकारले जाते. रहवासी गाळ्यासाठी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅटच्या तरतुदीखाली मुळ झालेले करारनामे असल्यास अशा निवासी सदनिकांसाठी रुपये. ७६०० + रु. ५,००,०००/- लाखाच्या वरिल मुल्यांकनावर ५% मुद्रांक शुल्क आकारले जाते.
मुद्रांक शुल्क पुढिल प्रमाणे भरता येते:
अ) गैरन्यायिक मुद्रांक (स्टॅम्प पेपर)
ब) फ्रॅंकिंग: (त्यासाठी मुद्रांक किमतीव्यतिरिक्त रु. १० ते १५ सेवाशुल्क आकारले जाते व सध्या केलेला दस्त फ्रॅंकिंग्साठी स्विकारला जात नाही. रु. ५०,०००/- च्या वरिल फ्रॅंकिंगसाठी पॅनकार्ड फोटोप्रत आवश्यक, योग्य चलनावर मुळ खरेदीदर व हस्ते दोघांच्या सह्या आवश्यक असतात.
क) चिकट मुद्रांक: हे जिल्हा कोषागारात मुळ सहि न झालेले दस्त दाखवुन व योग्य अर्जानंतर स्टेट बॅंकेत चलन भरुन दस्तावरील चिकट मुद्रांक (तिकिटाच्या स्वरुपात)प्राप्त होऊ शकतात.
ख) ई-स्टॅम्पिग: पुण्यात स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनद्वारा नोंदणी किंवा बिगर नोंदणी दस्तासाठी हि सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी योग्य नमुन्यात लिहुन घेणार/देणार यांचा तपशील, दस्तांचा प्रकार, रक्क्म, पॅन नंबर व मालमत्ता हस्तांतर असल्यास त्याचा तपशील असतो. हा मुद्रांक स्वतंत्र कंप्युटर प्रिंटवर लोगोद्वारा वरील सर्व तपशिलांसह व विना सेवाशुल्क मिळू शकतो. एकदा विकत घेतलेला मुद्रां मुंबई मुद्रांक काय्दा कलम ५२ नुसार सहा महिन्यात वाप्रणे बंधनकारक असते.

खरेदी खत

मालमत्तेचा हस्तांतर कायदा १८८२ कलम ५४ ते ५७ नुसार खरेदी म्हणजे मालमत्तेचे मालकी हक्काचे हस्तांतर म्हनजे अदा केलेल्या पुर्ण किमतीच्या बदल्यात किंवा अंशत: अदा केलेल्या किमतीच्या बदल्यात किंवा भविष्यात मोबदला देण्याच्या कबुलीवर नोंदणीकृत केलेला व्यवहार होय. याचाच अर्थ ठरलेला मोबदला पुर्ण किंवा अंशत: खरेदीपुर्वी, खरेदीच्या वेळी किंव खरेदी नंतर दिला तरी चालु शकतो.

खरेदीखत करताना साठेखतात/करारनाम्यात ठरलेल्या सर्व अटि किंवा शर्ती पुर्ण झाल्यास किंव कसे, हे बघणे खालील गोश्ती आवश्यक आहेत.

खरेदीखत विसार पावती, करारनामा यात नमुद केलेल्या अटी व शर्तीचा उल्लेख असणे आवश्यक असते. यात लिहुन देणार व घेणार यांचा नाव, वय, व्य्वसय, पत्ता, पॅन नंबर आवश्यक आसतो. याशिवाय मालमत्तेचे तपशीलवार वर्णन, पुर्वी झालेल्या मालमत्ता हस्तांतराचा तपशील व ताबा वेगवेगळ्या मंजुरी व परवाअनग्यांचा तपशील, ओनरशिप फ्लॅट कायद्यातील तरतुदीनुसार सोसायटी किंवा अपार्टमेंट झाले असल्यास त्याचा व सभासदत्वाचा तपशील, मालमत्ता विकण्याचे कारण, मोबदला तपशील व अदा करण्याची पद्धत, वेळ, ताब्याचा तपशील, निर्वेध टायटलबद्दल हमी, कर भरल्याचा तपशील, साक्षीदर, मालमत्ता विकण्याच्या आनी घेण्याच्या हेतुने केलेल्या सह्या, वगैरे तपशील असावा लागतो. विक्री करणा-यास हि मिळकत विकण्याचा हक्क व त्याचा तपशील असावा लागतो. विक्री क्रणा-यास सदर मिळकत विकण्याचा हक्क व त्याचा तपशील, देणर-घेणार यांचे पॅन नंबर गरजेचे असतात.

खरेदीखता सोबत:

१) करारनामा अस्तित्वात नसलेल्या मालमत्तेअबद्दल होऊ शकतो, मात्र खरेदीखत हे फक्त अस्तित्वातील मालमत्तेचेच होऊ शकते.

२) करारनामा हा फक्त दोन पक्षांना मान्य असतो. मात्र खरेदी खत हे सर्व जगाला मान्य असतो.

३) करारनामा म्हणजे मालमत्तेचे हस्तांतर नव्हे तर दोन पक्षातील खरेदी विक्री बाबतीत ठरलेल्या अटी, पण खरेदीखत म्हणजे मालमत्तेचे प्रत्यक्ष हस्तांतर होय.

४) करारनामा साधारणपणे अनोंदणीकृत असतो, मात्र खरेदीखत हे नोंदनीकृतच असावे लागते.

५) करारनाम्यातुन कोणतेच हक्क प्रदान होत नाहित, तर खरेदीखतातुन खर्वच हक्क प्रदान होतात.

त्यामुळे नुसत्या करारनाम्यावर किंवा साठेखतावर विसंबुन नराहता पुढे जाउण खरेदीखत आवश करुन घ्यावे.

सहकारी गृहसंस्था परवानगी व सभासदत्व/अपार्टमेंटचे सभासदत्व.

गाळा विकत घेण्यापुर्वी सोसायटीची परवानगी घेणे श्रेयस्कर असते. (मात्र बंधनकारक नसते) गाळा खरेदी केल्यानंतर विहित नम्य्न्यात सोसायटीच्या सभसदासाठी अर्ज करावा लागतो. सोबत खरेदीच्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करावी. त्यासोबत संस्थेने ठरवलेले गाळा हस्तांतर शुल्क जास्तीत जास्त रुपये २५,०००/- पर्यंत रितसर भरुन तशी पावती घ्यावी. संस्थेने सभासदत्व न दिल्यास उपनिबंधकाकडे दाद मागावी. योग्य पुर्तता केल्यास कायद्याने सभासदत्व देणे बंधनकारक असते. सभासदत्व मिळाल्यावर मुळ भाग प्रमाणपत्रांच्या पाठिमागील बाजुस संस्थेचे सचिव व अध्यक्ष यांचे हस्तांतर तपशील नोंदवुन घ्यावा व असे मुळ भाग प्रमाणपत्र मुळ दस्तांसोबत ठेवावेत.

मात्र, अपार्टमेंट असल्यास अपार्टमेंट असोसिएशनचे नोंदणीकृत घोषणापत्र व उपविधी त्यातील मिळकतीचा तपशील व डिड ऑफ आपार्टमेंट नोंदविलेले असेल तरच गाळ्याचा विचार करावा. मात्र सहकारी गृहसंस्थेच्या नावे जमिनीचे अभिहस्तांतर (conveyance) झाले किंवा कसे, हेही जरुर पाहावे.

साठेखत

साठेखत

मलमत्तेचा हस्तांतर कयदा सांगतो, की मिळकतीचे साठेखत/करारनामा म्हणजे मिळकतीचे हस्तांतर नाही, तर मलमत्ता घेणार/विकणार यांच्यामधेय ठरलेल्या अटी व शर्तीनुसार ठरविलेल्या कालावधीत कागदपत्रांची पुर्तता कर्य व शेवटी मालमत्तेचे हस्तांतर नोंदणीकृत खरेदीखताने करु, असा तपशील असतो.

साठेखतात खरेदीखताचा बहुतेक सर्व तपशील येतो. यात मालमत्तेचे वर्णन, तिय़्चा हस्तांतराचा प्रवास, विकाचाचा तपशील व विसार पावतीत दिलेला इतर तपशीक, ठरवलेल्या अटी, शर्ती यांचा स्पष्ट लेखी उल्लेख असतो. यात ठरलेला मोबदला देण्याची पद्धत, कालावधी, कागद्पत्रंची पुर्तत, विविध प्रकारच्या परबानगीचा तपशील व खरेदीखत नोंदविण्याची अंतिम मुदत यासंबंधात ठरविलेल्या अटी व शर्तीचा उहापोह असतो. अलोकडे साठेखत किंवा करारनाम्यास पुर्ण मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल लागते. पुढे असे मुद्रांक व नोंदनी शुल्क खरेदीखतस लागत नाही. अंतिमत: साठेखत किंवा करारनाम्याचे खरेदी खतात रुपांतर करणे गरजेचे आहे. खरेदी खतानंतरच पुढे रेकॉर्ड ऑफ द राईट्ला नाव लागतो व मालमत्ता टायटल पुर्ण होते.

करारनाम्यासोबत

१) जागेचा उतारा, एन.ए. आदेश, कमाल जमीन धारणा कयदा आदेश, झोन दाखला.

२) मंजुर आराखडा.

३) बांधकाम चालु परवाना.

४) वकिलाचे ओळखपत्र, पॅनकार्ड, घोषणापत्र वगैरे कागदपत्रे जोडावी लागतात.

Saturday, September 11, 2010

घर घेताना तपासायची कागद पत्रे - भाग १

जर तुम्ही बिल्डरकडुन घर घेत असल्यास सगळ्या कायदेशीर बाबिंची व कागद पत्रांची तपासनी करण्याची जबाबदारी बिल्डरची असते व त्याच्या वकिला मार्फत ते केले जाते. पण जर तुम्ही रिसेलचं घर घेत असल्यास मात्र तुमची फसवणुक होण्याची शक्यता असते. म्हणुन खालील कागद पत्रे तपासुन बघावी.

मिळकतीचा प्रवास प्रत्यक्ष जमिनीपासुन सुरु होतो. त्यामुळे सुरुवातीस पुढील कागदप्त्रांची तपासणी आवश्यक ठरते. जर मुळ कागदपते पाहण्यत मिळाली तर ठिकच, नाही तर शक्यतो प्रमाणित कागदपत्राम्च्या नकला व शेवटी फोटो प्रतीवरुन विकणा-याची विश्वासर्हता बघुन कागदप्त्रांची पाहणी करावी.

१) मलमत्ता जमिनीचा ७/१२ किंवा सिटी सर्व्हेचा चालु उतारा

२) जमीन/मालमत्ता ग्रामपंचायत गावठाणात असल्यास ग्रामसेवकाकडुन मिळालेला फार्म ८ चा उतार.

३) मुळ मालकाने स्वत: मालमत्ता विकसित केली कि बिल्डरद्वारा केली, हे तपासुन पुढील प्रमाणे योजना करावी. शक्यतो शहरी मालमत्ता बिल्डरच विकसित करीत असतात. अशा वेळी मुळ मालकाने बिल्डरबरोबर केलेल्या नोंदणीकृत विकसन कराराची प्रत, तसेच या संबंधातील नोंदणीकृत कुलमुखत्यार पत्राची प्रत तपासावी.

४) बिल्डरने सदर जमीन विकत घेतली असल्यास त्याच्या नावे ७/१२ किंवा सिटी सर्वे उतारा झाला किंवा कसे हे संबंधित फेरफर नोंदीवरुन तपासावे.

५) जमिन बिगरकृषीकेल्याचा (एन. ए.) जिल्हाधिकारी यांचा आदेश.

६) जमीन कमाल जमीन धारणा कायदा १९७६ खाली येत असल्यास त्याविशयी सक्षम अधिका-याचा आदेश/दाखला.

७) जमिनीचा झोन दाखला.

८) जमीन खासगी वन जमीन/ संरक्षित वन क्षेत्र वगैरे नसल्याचा दाखला.

९) मान्यताप्रप्त आर्किटेक्टसने केलेला व महापालिकेने किंवा टाऊन प्लॅनिंग धिका-याने मंजुर केलेला इमारतीचा आराखडा.

१०) इमरत बांधकाम चालु करण्याविषयी महापालिका दाखला.

११) जमिनीचा अक्रुषका सरा भरल्याच्या पावत्या.

१२) बांधकाम पुर्ण झाल्याचा महापालिका पुर्णत्वचा दाखला, भोगवटा प्रमाणपत्र.

१३) बिल्डरनबरोबर केलेला मुळ करारनामा/सुची क्र. २/ नोंदणिची पावती.

१४) बिल्ड्रला संपुर्ण पेमेंट केल्याच्या पावत्या.

१५) ताबा प्रमाणपत्र.

१६) बिल्डरचे वकिलाचे शोध व टायटल अहवाल व प्रमाणपत्र.

१७) सदर सदनिका/दुकान/कार्यालयांची पुनर्विक्रि झालेली असल्यास त्या सर्व व्यवहारांचे मुळ दस्त/सुची क्र. २ आणि मुळ नोंदणी पावत्या.

१८) सदर सदनिका मिळकत स्वत:च्या जमा रकमेतुन किंवा बॅंक वित्त संस्थ यांच्या कर्जातुन घेतलेली असल्यास त्याचा तपशील.

१९) पुर्वीचे नोंदणिकृत गहाणखत असल्यास नोंदणीकृत दस्ताने केलेले रिलीज डिड.

२०) महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट कायदा १९६३ नुसार सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन होऊन नोंदणी झालेली आहे का ? त्यानुसार.

(अ) सोसायटीचे नोंदणी प्रमाणपत्र

(ब) मुळ भाग प्रमाणपत्र वर्गनी भरल्याची चालु पावती

(क) सोसायटीचे अध्यक्ष/सचिव यांच्याबरोबर प्राथमिक बोलणी

(ड) सोसायटीच्या नावे झालेले जमीन व इमारतीचे खरेदीखत.

२१) आपार्टमेंट असोसिएशन झालेले असल्यास

(अ) अपार्टमेंट्च्या उपविधीसहित मुळ जमीनमालक व विकसकाने नोंदविलेले सदर अपार्टमेंटचा तपशील असलेले घोषणापत्र.

(आ) डीड ऑफ अपार्टमेंट

(इ) त्यानुसार सिटी सर्व्हेला नोंदविलेला तपशील.

२२) अशी सोसायटी किंव अपार्टमेंट नोंदणी झालेले नसल्यास शक्यतो खरेदीच्या फंदात पडु नये. मात्र तसे करणे आवश्यकच असल्यास बिल्डरचे ना हरकत प्रमाणप्तर व कायदेशीर पुर्तता करु असे हमीपत्र घ्यावे.

२३) मिळकतीचा चालु लाईटबिल.

२४)मिळकतीचे चालु महापालिका कर भरल्याचे बिल/पावती. ही सर्व कागदपते तपासल्यावर पुढील तपासणीसाठी व मालमत्तेचा शोध व टायटल बरोबर आहे का व कायदेशीररित्या मालमत्ता घेणे उचित ठरेल का, यासाठी जाणकार मालमता व्यवहार पाहणा-या तंज्ञांकडे सुपुर्त करावे व त्यानी प्राथमिक तपासनी केल्यावर मालमत्ता लिहून देणा-याबरोबर विसारपावती करावी. अश्या साठेखतासही पुर्ण मुद्रांक व नोंदणीशुल्क लागत असल्याने, सर्व व्यवहार नक्की झाल्यावरच असे साठेखत वकिलांच्या सल्यानुसार नोंदणी करुन घ्यावेत. सदर गाळ्याच्या अगोदरच्या मालकापैकी कोणी मयत असल्यास मृत्युचा खाखला, वारसांचे नोटराईज, ऍफिडेविट व सोसायटी अथवा अपार्टमेंट असोशिएअनला झालेली वारसांची नोंद आवश्यक ठरते.

विसार पावती

सदनिका मिळकत विकत घेण्याचे नक्की झाल्यावर लिहुन देनार व घेणार या दोघानाही काही तरी कायदेशीर चौकटीचा आधार असावा म्हणून मालमत्तेची किंमत ठरविल्यानंतर मालकास विसार म्हणुन काही रक्कम रोख किंवा चेकच्या स्वरुपात दिली जाते. इसार पावतीत साधरणपणे पुढील मजकुर असतो.

१) लिहुण देणा-याचे नाव, वय, व्य्वसाय व पत्ता.

२) लिहुन घेणा-याचे नाव, वय, व्यवसाय व पत्ता.

३) मालमत्तेच वर्णन.

४) मोबदला किंमत व ती अदा करण्याची पद्धत व वेळापत्रक किंवा कालावधी.

५) कागदपते पुरविण्याविषयी अटी.

६) विविध प्रवानग्या मिळविण्याविषयी अटी.

७) कायदेशीर बाजुच्या पुर्तता करण्याविषयी अटी.

८) इतर अटी, पुर्तता तपशील.

९) खरेदीखत/करारनामा करण्याचा कालावधी

१०) स्टॅंम्पींग-विसार पावती नुसत्या १ रुपयाच्या रेव्हेन्यु तिकिटावर चालु शकते, मात्र वाद उदभवु नये म्हणुन शक्यतो रुपये १००/- चे गैरन्यायालयीन स्टॅंम्पवर नोटराईज करावे म्हणजे वाद झाल्यास पुरावा कामी योग्य ठरतो.

११) लिहुन देणार/घेणार यांच्या सह्या.

१२) दोन साक्षीदारांच्या सह्या.

विसार पावती नोंदणी करता येते. मात्र सदर नोंदणीस खरेदीप्रमाणेच पुर्ण मुद्रांक व नोंदणीशुल्क लागते. हे शक्यतो टाळावे. कारण कायदेशीर बाजुंची पुर्तता न झाल्यास व ठराविक कालावधीत व्य्वहार न झाल्यास ठरलेल्या अटीप्रमाणे विसार रक्कम परत करुन व्य्वहार मोडला जाऊ शकतो. मात्र, नोंदणीकृत दस्ताने केलेला व्यवहार, सदर व्यवहार फिस्कटल्यास नोंदणीकृत दस्तानेच रद्द होऊ शकतो. म्हणजे रद्द करायला परत नोंदणी.

शोध व टायटल प्रमाणपत्र

विसार पावती केल्यानंतर मिळकतीचा मुळ मालक वरिलप्रमाणे उपल्ब्ध कागदपत्रांच्या पोटोप्रती मिळकत विकत घेणा-यास ठरलेल्या अटी प्रमाणे देतो. अशी सर्व कागदपत्रे तज्ञांकडुन तपासुन घ्यावित. उर्वरित कागदपत्रे एकत्र करावीत. शोध व टायटल प्रमाणपत्रात पुढील बाजुंचा मालमत्तेच्या प्रकारानुसार व घेणार/विकणार यांचे कायदेशीर अस्तित्व तपासुन पुढील बाजूंचा विचार आपल्याअ अहवालात करतात.

१) कोणातर्फे शोध व टायटल प्रमाणपत्र काम करतात, त्या पक्षाचा तपशील, पत्ता वत्यांच्या आदेशाचा सारांश.

२) तपासलेल्या कागदपत्रांचा तपशील.

३) मालमत्ता लिहुन देणार वघेणाराचा कायदेशीर तपशील.

४) मालमत्तेचे पुर्ण वर्णन.

५) शोधांचा तपशील/शोध पावती यात

अ) ज्या उपनिबंधकाच्या कार्यक्षेत्रात मिळकत येते त्याचा तपशील.

आ) ज्या वर्षाचा शोध घेतला त्याचा तपशील.

इ) उपलब्ध तपासलेल्या कागदपत्रांची व सुची क्रं. २,३ व ४ चा तपशील.

ई) संगणकातील उपलब्ध सुची क्रं २, स्कॅन दस्ताचा तपशील.

उ) नोंदणी कायद्याप्रमाणे नोंदणी शुल्क, पुर्व दस्ताचे नोंदणी शुल्क भरल्याचा तपशील.

ऊ) मालमत्तेचे हस्तांतर कोणत्याही मार्गाने म्हणजे साठेखत, गहाणखत, लीज, हक्कसोड, तबदील, दान, अदलाबदल, चार्ज, लिस पेंडन्स हक्क वगैरे संदर्भातील तपशील. मालमत्तेचा शोध हे जिकरीचे, वेळकाढु, क्लिष्ट काम असते. मात्र, या व्यवहारात होणा-या फसवणुकीचे प्रकार पाहता आवश्यक ठरते.

******************************

(पुढच्या भागात वाचा) टायटल रिपोर्ट