VAT
बिल्डर
असोसिएशन वॅटची केस हारली असून सर्व फ्लॅटधारकाना आता वॅट भरावा लागणार आहे. पण
प्रश्न असा आहे की तो वॅट कधीपासून भरायचा व काय रेटनी भारायचा.
1) २००६ मध्ये महाराष्ट्र सरकारने VAT लागू केला होता व त्याचा रेट ५% ईतका होता. पण बिल्डर संघट्नेनी याचा
विरोध करत कोर्टात केस दाखल केली.
2) १
एप्रिल २०१० नंतर वॅट कायद्यात बदक करुन महाराष्ट्र सरकारने तो १% ईतका केला.
आता
मात्र प्रश्न असा पडतो की ग्राहकानी वॅट किती भरायचा आहे? ५% की १% ? उत्तर सोपं
आहे. ज्यांच्या घराचे खरेदी खत १ एप्रिल २०१० नंतर नोंदविले गेले त्यानी खरेदी
खतातील रक्कमेवर १% ईतकाच वॅट भरायचा आहे.
पण
ज्यानी १ एप्रिल २०१० पुर्वी पण एप्रिल २००६
च्या नंतर खरेदी खत केले आहे त्यानी नेमका किती वॅट भरावा? तेंव्हाच्या वॅट तरतूदी प्रमाणे ग्राहकानी खरेदी
रकमेवर ५% ईतकेच भरावे लागेल. पण हा डिस्पूट चालू आहे. याचा निकाल या महिन्याच्या
शेवट पर्यंत येणार असून २००६ ते २०१० च्या दरम्यान घेतलेल्या घरांवर ५% की १% हे
लवकरच कळेल.
व्याज:-
वरील वॅटची रक्कम भरताना ग्राहकाला १५% वार्षिक दराने व्याज भरणे बंधनकारक आहे.