Saturday, April 9, 2011

घरावरील वॅट व सेवाकर

घर घेताना बिल्डरकडुन जो रेट सांगितला जातो तो इतर कुठलाही खर्च न धरता निव्वड रेट असतो. समजा तुम्ही एखाद्या बिल्डरकडे गेलात अन त्यानी तुम्हाला ५६० चौ. फु. चा फ्लॅट दाखविला. प्रती चौ.फु. किमंत समजा ३०००/- रुपये सांगितली तर ५६० x ३००० = १६,८०,०००/- ही जी किंमत येते ही सर्व कर वगळता काढलेली किंमत आहे. किंवा याला मुळ किंमत म्हणतात. या मुळ किमतीत आत्ता पर्यंत ३ खर्च जोडाले जात. पण आता यात आजुन दोन (म्हणजेच एकुन ५ किमती जोडल्या जातात. ते एकुन पाच खर्च खालील प्रमाणे आहेत.
  1. घराची नोंदणी (स्टॅंप ड्युटी व रजिस्ट्र्रेशन)
  2. मीटर जोडणी
  3. सोसायटी नोंदणी खर्च
  4. सेवा कर (सर्विस टॅक्स)
  5. मुल्यवर्धित कर (वॅट)
घराची नोंदणी व स्टॅम्प ड्युटी कशी आकारली जाते यावर मागे लेख लिहला आहे. आता आपण उरलेल्या ईतर खर्चांबद्दल बघुया.

१)  मीटर जोडणीचा खर्च: मिटर जोडणीचा खर्च १८,०००/- ते २०,०००/- हजाराच्या घरातच जातो. पण बांधकाम व्यवसायिकांकडुन मिटर जोडणीसाठी सर्रासपणे ५० ते ६० हजार रुपये घेतले जातात. ही तर ग्राहकाची शुद्ध फसवणुक आहे. या खर्चाबाबत ग्राहक बिल्डरकडे मिटरजोडणीच्या मुळ पावत्याची मागणी करुन अधिकची होणारी लुट थांबवु शकतो.
२)  सोसायटी: नोंदणीच्या नावाखाली प्रत्येक बिल्डरच वेगवेगळी रक्कम आकारतो. या खर्चाच्या मुळ पावत्या मागुण हा खर्च वाचवता येतो.
३)  सेवा कर: २.५७५% (१ जुलै २०१० नंतर दिलेल्या रकमेवर) आकारला जातो. हि रक्कम दयावीच लागते. कारण तुमच्याकडुन वसुल केलेला सेवा कर केंद्र सरकारला भरल्या जातो. सेवाकर भरल्याची बिल्डरकडुन पावती घ्यावी. कारण हा करं गोळा करुन बिल्डर एकत्रीतपणे तो सरकारला भरतो. त्यामुळे टी.डी.एस. सारखा या कराचा तुमच्या खात्यावर परिणाम दिसत नाही.
४)  वॅट: १% नोंदणी रक्कमेवर (Agreement Value) लावल्या जातो. पण आजच्या घडिला कुठल्याही बिल्डरला वॅटची रक्कम घेण्याचा अधिकार नाही. कारण बिल्डर असोसिएशननी वॅटच्या विरोधात कोर्टात केस दाखल केली आहे. जोवर या केसचा निकाल येत नाही तोवर तुमच्याकडुन कर घेण्याचा बिल्डरला कुठलाही अधिकार नाही. तरी बिल्डरमात्र वॅटची मागणी करतात. कारण उदया जर केसचा निकला यांच्या विरोधात लागला तर ज्या तारखेला वॅटचा सर्कुलर निघाला होता त्या तारखेपासुन झालेल्या सर्व विक्रीच्या व्यवहारावर कर बसेल. हा कर स्वत:च्या खिशातुन भरण्याची वेळ येऊ नये म्हणुन बेकायदेशीरपणे तुमच्याकडुन वॅट घेतला जात आहे. त्यामुळे तुम्ही जर घर घेत असाल व बिल्डर वॅटची मागणी करत असेल तर बेधडकपणे विरोध करा. त्याला वॅटची रक्कम मागण्याचा अधिकारच नाही. आजच्या तारखेला बिल्डरकडुन मागितल्या जाणारा वॅट नकारण्याचा ग्राहकाला पुर्ण अधिकार आहे.

साधारणता घराची किंमत किती येते ते बघुया.
 
फ्लॅट घेत असाल तर खालील प्रमाणे एकुण किंमत काढावी.
बिल्ट अप एरिया ५६० चौ. फु. व रेट ३०००/- प्रती फुट
५६० ३०००    = १६,८०,०००/-
मिटर                   =    ६०,०००/-
सोसायटी             =    १०,०००/-
------------------------------------------
निव्वड किंमत       १६,८०,०००/- (काही रक्कम ब्लॅक मधे घेऊन नोंदणीची रक्कम १० ते १४ लाख वगैरे दाखविली जाते)
सेवाकर @ २.५७५%    ४३,२६०/-         (१ जुलै नंतर आलेल्या रकमेवर)
वॅट @ १%                   १६,८००/-          (on Agreement Value)    
 ----------------------------------------
एकुन किंमत  रु.   १८,१०,०६०/-

म्हणजेच चौ.फु. प्रमाणे जी रक्कम निघते त्याच्यात किमान सव्वा ते दिड लाखाची भर पडते.


No comments:

Post a Comment